‘पिंपरी :- चिखली येथील नूर ए इमान सोशल तेहरीक (निस्ट)च्या वतीने आमदार महेश लांडगे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी माजी महापौर राहुल जाधव, नगरसेविका साधना मळेकर, अश्विनी जाधव,स्वीनल म्हेत्रे, नगरसेवक कुंदन गायकवाड, स्वीकृत सदस्य दिनेश यादव, संतोष मोरे, शिवाजी महाराज पतसंस्था संस्थापक दत्ताञय मोरे, चेअरमन विठ्ठलआबा मोरे, टाळगाव पतसंस्था चेअरमन रोहीदास मोरे, जयवंत मोरे, बाळासाहेब मोरे, प्रकाश मोरे, ज्ञानेश्वर नेवाळे,मौलाना अबरार अहेमद, नुरुद्दीन मौलवी, अमजद शेख, नूर ए ईमान तेहरीकचे अध्यक्ष फिरोज शेख, इसाक शेख आदी उपस्थित होते. आमदार महेश लांडगे म्हणाले कि, राजकरण हे निवडणुकीपुरते मर्यादित असते. कार्यकर्त्यांनी राजकारणामुळे मैत्रीत किंवा नात्यात कटुता आणू नये. जे मोठे नेते आहेत त्यांनी आपल्या कर्तृत्ववामुळे यशाचे शिखर गाठलेले असते. त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह सोशल मीडियावर किंवा टीका करणे योग्य नाही. राजकारणी मंडळींचा आदर राखावा या हेतूने “आदरयुक्त राजकारण” हि चळवळ सुरू केली. हि चळवळ व्यापक बनली पाहिजेत अशी इच्छा व्यक्त केली. माजी महापौर राहुल जाधव म्हणाले कि, आमदार लांडगे यांनी आदरयुक्त राजकारण हि मोहीम राबवून एक आदर्श निर्माण केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी अंबिके यांनी तर फिरोज शेख आभार यांनी मानले.