पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराने मला बहुमत दिलं, साथ दिली त्यामुळेच आज या शहराचा विकास दिसतो. पुण्यात नाही त्यामुळे पुण्यात निर्णय घेणे कठिण असल्याचे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी अभिनेता राहुल सोलापुरकर यांनी तुम्ही पिंपरी-चिंचवड शहराचा इतका विकास केला, मात्र पुण्याला सावत्र भावाची वागणूक दिली या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना पवार म्हणाले की, दोन्ही शहरे मला
सारखीच आहे.
पिंपरी-चिंचवडचा विकास मी एकट्याने केला नसून, त्यात सर्वांचे योगदान आहे. फरक एवढाच की इथल्या लोकांनी बहुमत दिले, विकासाच्या ठरावाला सहकार्य केले त्यामुळेच हे शक्य झाले. याउलट चित्र पुण्यात असून, तिथे विकास करायला गेले की समाजसेवी संस्था सरळ न्यायालयात जातात. ते चांगल आहे पण त्यामुळे कधी-कधी अड़थळा निर्माण होतो.
पिंपरी- चिंचवड मध्ये उभारणार देशातील सर्वात उंच ध्वज – अजित पवार
पिंपरी चिंचवड शहरात लवकरच देशातील सर्वात ऊंच तिरंगा ध्वज उभारणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या ध्वजाची उंची ही 107 मी. असेल तर ध्वज हा 120 फुट लांब व 180 ़फूट ऊंच असेल. यासोबतच शहरात लवकरच भोईर म्हणतात त्याप्रमाणे एक नाट्य संकुल उभारणार आहोत.
मात्र त्यासाठी जागेची अड़चण आहे, ती चर्चेतून सोडवू. भाऊसाहेब भोईरनेही मागच्या गोष्टी मनाला लावून न घेता कामाला लागावे, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असा सकारात्मक सल्ला पवार यांनी भोईर
यांना दिला.