दैनिक पास ओळखपत्र दाखवल्यावरच
15 ऑक्टोबरपासून होणार अंमलबजावणी
पिंपरी : पीएमपीएमएलच्या 50 रुपयांचा दैनिक पास यापुढे ओळखपत्र दाखवल्यानंतरच देण्यात येणार आहे. या नव्या नियमाची अंमबजावणी येत्या 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात
येणार आहे.
रेन्बो बीआरटीएस सेवेला पुण्यामध्ये एकवर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पीएमपीएमएलतर्फे प्रवाशांना दैनिक पास केवळ 50 रुपयांत उपलब्ध करुन देण्यात आला होता. मात्र काही नागरिकांनी याचा गैरफायदा घेणे सुरु केल्याने वरील नियम लागू करण्यात
आला आहे.
याविषयी एमपीसी न्यूजशी बोलताना पीएमपीएमएलएचे प्रवक्ते सुभाष गायकवाड म्हणाले की, नागरिकांनी आमच्या 50 रुपयांचा दैनिक पास या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला आहे. मात्र, काही नागरिक एकाच पासचा दोन ते तीन व्यक्ती वापर करण्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हा गैरवापर रोखण्यासाठी प्रवाशांना यापुढे पास काढताना त्यांचे आधारकार्ड, पीएपीएमपीएमएलचे ओळखपत्र, पॅनकार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट आदी ओळखपत्र दाखवावे लागणार असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
50 रुपयांचा दैनिक पास हा उपक्रम फेब्रुवारी 2017 अखेरपर्यंत चालू ठेवला जाणार असून नागरिकांनी या योजनेचा योग्य तो फायदा घेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पीएमपीएमएल प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here