साक्री – येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूल येथे मंगळवार दि. २४ डिसेंबर रोजी फॅन्सी ड्रेस स्पर्धा तसेच ख्रिसमस सण साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या भारती पंजाबी होत्या. यावेळी, वैभव सोनवणे उपस्थित होते.
ख्रिसमस साठी ख्रिसमस ट्री सजवण्यात आला होता. सांताक्लॉजची भुमिका वृषाली सोनवणे यांनी साकारून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. प्रसंगी, विद्यार्थी – शिक्षकांनी एकमेकांना ख्रिसमस सणाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर केक कापून जिंगल बेल या गाण्यावर सांताक्लॉजने नृत्य सादर केले.
ख्रिसमस या सणाविषयी प्राचार्या भारती पंजाबी यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या, ख्रिसमस हा सण येशू ख्रिस्ताचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो. बारा दिवस हा उत्सव सूरू असतो. या दिवशी ख्रिस्ती समाजबांधव एकत्र येवून मेणबत्त्या लावून ख्रिसमस गीत सादर केले जात असल्याचे पंजाबी यांनी सांगितले.
ख्रिसमस निमीत्त फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली.
यामध्ये, नर्सरीसाठी – फुले (फ्लॉवर). एलकेजी – आपले मदतगार (अवर हेल्पर). युकेजी – वाहने (व्हेकल). असे विषय देण्यात आले होते.
यात नर्सरी – प्रथम क्रमांक – शाहुराजे सावंत. द्वितीय क्रमांक – सार्थ पंजाबी. तृतीय क्रमांक – यज्ञेश चौधरी.
एलकेजी गोल्ड – प्रथम क्रमांक – गौरवी सोनवणे. द्वितीय क्रमांक – गितेश्वरी नांद्रे, तृतीय क्रमांक – तन्मय जाधव.
एलकेजी डायमंड – प्रथम क्रमांक – तन्वी सोनवणे. द्वितीय क्रमांक – अनुश्री देशमुख. तृतीय क्रमांक – प्रणिती गांगुर्डे, निधी सदन.
युकेजी (लोटस) – प्रथम क्रमांक – रिद्धी सोनवणे. द्वितीय क्रमांक – सुशांतसिंग राजपूत, तृतीय क्रमांक – अर्पित भदाणे.