पिंपळनेर – प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथे शुक्रवार दि. २० डिसेंबर रोजी वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी क्रीडा शिक्षण शरद बोरसे, प्राचार्या वैशाली लाडे, समन्वयक राहुल अहिरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी परेड संचालनाद्वारे मान्यवरांचे स्वागत केले. सरस्वती पूजनानंतर मशाल पेटवून तसेच क्रीडा प्रार्थनेने स्पर्धांना सुरुवात झाली. तसेच, विद्यार्थ्यांनी कवायत सादर केली. यासह, विद्यार्थ्यांचे ऐरोबिक्स डान्स झाले. प्रमुख पाहुणे बोरसे यांनी विद्यार्थ्यांना खेळाविषयी माहिती व गीत सादर केले. राहुल पाटील यांनी खेळांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती सांगितली.

या कार्यक्रमासाठी श्रीमती ज्योती, श्रीमती कमल, श्रीमती शामल यांनी सुंदर रांगोळीचे रेखाटन केले. तसेच, फलक लेखन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अर्चन मॅडम यांनी केले.

क्रीडा महोत्सवात अशा रंगल्या स्पर्धा

क्रीडा महोत्सवात नर्सरीच्या विद्यार्थ्यांसाठीरनिंग, फ्राग जम्प, बुक बॅलन्स, बलुन ब्रस्ट, हे खेळ घेण्यात आले.

युकेजी च्या विद्यार्थ्यांसाठी रनिंग, वन लेग रनिंग, ब्लाईंड आईस सर्च थिंग, सर्कल अँड स्टार हे खेळ घेण्यात आले.

युकेजीरनिंग, लेमन अँड स्पुन रेस, बलुन बॅलन्सींग वुइथ लेगस्‌, थ्रोव्ह बॉल इन बास्केट असे खेळ झाले.

पहिली वर्गासाठीरनिंग, लाँग जम्प, डक वॉल्क रेस, थ्रोव्ह बॉल डाऊन बॉटल असे खेळ पार पडले.

दुसरा वर्गरनिंग, थ्री लेग रनिंग, मुझिक चेअर, ब्लोव बॉल.

तिसरा वर्गरनिंग, सॅग रेसिंग, वन लेग रनिंग, थ्रोव्ह बलुन इन एअर.

चौथा वर्गरनिंग, होप स्कॉच असे खेळ घेण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here