पिंपरी चिंचवड – पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. पुणे संचालकपदी शंकर पवार, सभासद, पुणे महानगरपालिका यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचा सत्कार पिंपरी चिंचवड महापालिका महापौर उषा ढोरे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन करण्यात आला. पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. च्या व्यवस्थापकीय रचनेमध्ये सभासद, पुणे महानगरपालिका हे पदसिद्ध संचालक आहेत. सिद्धार्थ शिरोळे हे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर शंकर पवार यांची कंपनी कायदा २०१३ मधील तरतुदीनुसार पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. पुणे च्या संचालक मंडळावर संचालकपदी नियुक्ती करण्यात अली आहे. त्यांचा सत्कार समारंभ महापौर कक्षात आयोजित करण्यात आला होता.