आजच्या स्त्रियांना जे स्वातंत्र्याचे जीवन जगायला मिळत आहे, त्याचे श्रेय केवळ सावित्रीबाईंना – प्राचार्या वैशाली लाडे

पिंपळनेर – पिंपळनेर प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी स्कूलच्या प्राचार्या वैशाली लाडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. तद्नंतर सर्व शिक्षकांनी सुद्धा प्रतिमेचे पूजन केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषणे दिली.

त्यात सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी आपले सर्व जीवन वाहिले, मुलींना शिक्षण घेता यावे, म्हणून चिखलमाती लोकांनी त्यांच्या अंगावर फेकले, तरीसुद्धा त्या डगमगल्या नाहीत. आजच्या स्त्रियांना जे स्वातंत्र्याचे जीवन जगायला मिळत आहे, त्याचे श्रेय केवळ सावित्रीबाईंना आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून त्यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून संपूर्ण जगभर साजरा करण्यात येतो. शाळेतील शिक्षकांनी सुद्धा त्यांच्या जिवन कार्याबद्दल विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी, सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

आद्य शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे कार्य प्रेरणादायी व क्रांतीकारी आहे. सावित्रीबाईंचा निस्सीम त्याग व धैर्यामुळे आजच्या महिलेला समाजात मानाचे व प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त झाले आहे. सावित्रीबाईंचे प्रगतशिल व शिक्षित समाज घडविण्याचे कार्य पुढे नेणे हिच खरी काळाची गरज असल्याचे प्रतिपादन शिक्षीका अनिता पाटील यांनी केले. विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईच्या जिवन चरित्रावर भाषणे, नाटिका व गाणी सादर करून सावित्रीबाईंच्या शैक्षणिक कार्याची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here