पिंपरी :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका व बाबूरावजी घोलप महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील महाविद्यालयातील ३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

या वक्तृत्व स्पर्धेचे उदघाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. तसेच सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, महाविद्यालयाचे मराठी भाषा विभागप्रमुख डॉ. एम.एम. बागुल, इतिहास विभागप्रमुख सावित्री सावंत, प्राचार्य क्रांती बोरावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मराठी भाषा विषयावरील या वक्तृत्व स्पर्धेत बाबूरावजी घोलप महाविद्यालय, टिकाराम जग्गनाथ महाविद्यालय खडकी, सर परशुरामभाऊ महाविद्यालय पुणे, रामकृष्ण मोरे महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध, मॉडर्न महाविद्यालय गणेश खिंड, अनंतराव पवार महाविद्यालय पिरंगुट, आयबीएमआर चाकण इ. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या वक्तृत्व स्पर्धत मधुरा कुलकर्णी या विदयार्थीने रोख र.रु. ५,०००/- चे प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्राप्त केले. द्वितीय क्रमांकाचे रोख र.रु. ३,०००/- चे बक्षीस रोहन कवडे या विद्यार्थ्याने तर तृतीय क्रमांकाचे रोख र.रु. २,०००/- चे बक्षीस विशाखा पतंगे या विदयार्थीनीने पटकवले. पल्लवी क्षीरसागर व हर्षदा जाधव या विद्यार्थींनींना रोख र.रु.१,०००/- चे उत्तेजनार्थ बक्षित प्राप्त झाले. या स्पर्धेचे परिक्षक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर व बाबुराव घोलप महाविद्यालयाचे प्राचार्य जितेंद्र वडशिंगकर यांनी काम पहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुवर्णा खोडदे यांनी तर सूत्रसंचालन डॉ. नंदा राशिनकर यांनी केले. तसेच आभार डॉ. संगीता घोडके यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here