Chaupher News
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, अग्निशामक विभागाच्या वतीने माध्यमिक विद्यालय, थेरगाव शिक्षण संकुल, थेरगाव येथील शाळेच्या प्रांगणात राष्ट्रीय स्तरावर अग्निशमन व बचावाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्या आदेशानुसार राबविण्यात आलेल्या या प्रात्यकक्षिक सादरीकरणाच्या कार्यक्रमात सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, आपत्ती व्यवस्थापनचे ओमप्रकाश बहिवाल, जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले, सहा. पोलिस निरिक्षक, पी. एन. चौगुले, एस. जी. रनवरे, सब ऑफिसर अरविंद गुळींग, सौरभ गिरकर, ए. बी. परब, सुर्यकांत मठपती, फारमन मनोज मोरे, मिलिंद पाटील, भुषण येवले, भाईदास लांडगे, दिलीप गायकवाड वाहनचालक राजाराम लांडगे, अमोल रांजणे, शुभम काळे आदी उपस्थित होते.
इमारतीला आग लागल्यास विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे शाळेच्या इमारतीबाहेर कशाप्रकारे बाहेर काढले पाहिजे, तसंच शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी सुरक्षित इमारतीबाहेर कसे पडावे, याबाबतची माहिती व प्रात्यकक्षिके करुन दाखवण्यात आली. तसेच छोट्या स्वरुपात लागलेल्या आगीचे शमन कसे करायचे याचे प्रत्यकक्षिक आग विझविण्याचे नायट्रोजन सिलेंडरद्वारे शाळेतील सिखक क शिक्षकांकडून अग्निशामक विभागाच्या दलाने करुन घेतले. आपत्ती व्यवस्थापनाचे ओमप्रकाश बहिवाल यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले यांनी केले. तर आभार प्रभारी प्राचार्य चंद्रशेखर कदम यांनी मानले.