Chaupher News

मुंबई : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील जनतेला मनसेच्या नवीन झेंड्याविषयी कुतूहल होते. या झेंड्यात छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असल्याच्या वृत्तांमुळे चर्चेला उधाण आले होते. अखेर शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४ व्या जयंतीदिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण करण्यात आलं आहे.
मनसेचं महाअधिवेशन आज पार पडत असून राज ठाकरे यांनी यावेळी पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं. मनसेच्या नव्या झेंड्यात भगवा रंग असून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. या झेंड्याचा फोटो काही दिवसांपूर्वी समोर आला होता. मात्र पक्षाकडून अधिकृत घोषणा झाली नव्हती. आज अखेर राज ठाकरे यांनी अधिकृतपणे नव्या झेंड्याचं अनावरण केलं.

राज ठाकरे यांनी झेंड्याचं अनवारण करण्याआधी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. तसंच आपण संध्याकाळी भाषण करणार असून त्यात सविस्तर बोलणार असल्याची माहिती दिली.

मनसेने याआधी अधिकृत ट्विटर हँडलवरुन पक्षचिन्हाच्या मागे असलेला झेंडा हटवला होता. त्याआधीपासून मनसे झेंडा बदलणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र ट्विटरवर बदल केल्यानंतर तसे संकेत मिळाले होते. पक्षाच्या आधीच्या झेंड्यात निळा, भगवा आणि हिरवा असे तीन रंग होते. मात्र आता त्यात बदल करण्यात आला असून चार रंगांऐवजी फक्त एकच भगवा रंग आहे. तसंच भगव्या रंगाच्या या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here