Chaupher News

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने शिवसेनेसाठी व ठाकरे कुटुंबासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या 94 व्या जयंतीला विशेष महत्त्व आहे. यानिमित्त शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांचं स्मृतिस्थळ फुलांनी सजवण्यात आले असून शिवसेनेकडून बिकेसी येथे जल्लोष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी ठाकरे कुटुंबीय शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर येणार आहेत. याशिवाय राज्यभरातून शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांसह महाविकास आघाडीतील मंत्रीही हजेरी लावणार आहेत.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भव्य सत्कार सोहळा शिवसैनिकांकडून करण्यात येणार आहे.महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर भाजपसोबतची युती तोडून शिवसेनेन राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत महाविकासआघाडीकरत सत्तास्थापन केली आणि त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे महाराष्ट्राला शिवसनेता मुख्यमंत्री मिळाला. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. अशातच आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या 94व्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांकडून वांद्रे येथील एमएमआरडीए ग्राउंडवर भव्य जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे.

बाळासाहेबांच्या 94व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहणारं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. त्या ट्वीटमध्ये ते म्हणाले आहेत की, महान बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली. धैर्यवान आणि दुर्दम्य साहस असलेल्या बाळासाहेबांनी लोकांच्या कल्याणाचे प्रश्न उपस्थित करण्यास कधीही मागेपुढे पाहिले नाही. त्यांना नेहमीच भारतीय नीतिनियम आणि मूल्ये यांचा अभिमान होता. ते लाखो लोकांसाठी प्रेरणादायी स्थान आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here