Chaupher News
मुंबई : उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाणारे राष्ट्रपती पोलीस पदक देशातील 1040 पोलीस अधिकारी एवं कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले असून यामध्ये महाराष्ट्रातील 54 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने आज जाहीर केले. गेल्या वर्षी महाराष्ट्रातील एकूण 46 पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर झाली होती. त्यातील पाच जणांना विशेष सेवेसाठी, तर 41 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी सन्मानित करण्यात करण्यात आले होते.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने आज राष्ट्रपती पोलिस पदक, जीवन रक्षा पदक, अग्निशमन सेवा पदक, नागरीसेवा दल पदक आदींची घोषणा केली आहे. राष्ट्रपती पोलिस पदकांमध्ये उल्लेखीनय कामगीरीसाठी पोलिसांना दिले जाणारे शौर्य पदक, विशिष्ठ सेवा पदक व गुणवत्ता सेवा पदक जाहिर करण्यात आले आहेत. यामध्ये देशातील 1040 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
देशातील 4 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक, 286 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलिस शौर्य पदक तर 93 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विशिष्ठ सेवा पदक आणि 657 पोलिसांना गुणवत्ता सेवा पदक जाहीर झाले आहे.