Chaupher News

मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटातील ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. ओंकार स्वरुपा सदगुरु समर्था, तू सप्तसूर माझे, ऐ जिंदगी गले लगा ले, सपने में मिलती है, मेघा रे मेघा रे, चप्पा चप्पा चरखा चले यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांमुळे सुरेश वाडकरांनी चाहत्यांच्या मनावर त्यांच्या आवाजाची छाप सोडली आहे.

सुरेश वाडकर यांचा जन्म 7 ऑगस्ट 1955 मध्ये कोल्हापूर येथे झाला. गाण्याची आवड असल्याने वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली. पंडित जियालाल वसंत यांच्याकडे त्यांची संगीताचे धडे गिरवले. सुरेश वाडकर यांना 2007 मध्ये महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. त्याच प्रमाणे त्यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कारही मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here