Chaupher News

मुंबई : ‘दिल तो हैप्पी है जी’ या टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध मालिकेची अभिनेत्री सेजल शर्मा हिने आज पहाटे आपल्या राहत्या घरी पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दिल्लीच्या मित्राने मीरा रोड पोलिसांना फोन करून ही माहिती दिली. त्याच्याशी ती उशिरापर्यंत मोबाईल वर बोलत होती. आत्महत्येवेळी तिच्या घरी तिची मैत्रीण तृप्ती पामेचा आणि तृप्तीचा मित्र आदित्य नागवंशी ही राहत होते. सेजलने आत्महत्येपूर्वी सुसाइड नोट लिहून ठेवली होती. त्यात तिने आपल्या मृत्युला कुणालाही जबाबदार धरु नये, तसेच आपण दोन महिन्यापासून डिप्रेशनमध्ये असल्याच म्हटलं आहे.

सेजल मीरा रोड मध्ये रॉयल नेस्ट या इमारतीमध्ये राहते. सेजल आणि तिचे दोघे मित्रांनी रात्री सव्वा बारा वाजता जेवण केलं. त्यानंतर सेजलला तिच्या मित्राचा फोन आला. ती तिच्याशी बोलता बोलता बेडरूममध्ये गेली. त्यानंतर तिच्या मित्राने पहाटे साडे तीन वाजता मीरा रोड पोलिसांना फोन करून सेजलने आत्महत्या केल्याची माहिती दिली. या घटनेने टेलिव्हिजन क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here