Chaupher News
प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये ७१ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला लाभलेले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जवान राकेश मधुकर नेरे, शांताराम पगारे, शाळेचे प्राचार्य अतुल देव, प्राचार्या भारती पंजाबी, व्यवस्थापक वैभव सोनवणे, तुषार देवरे उपस्थित होते.
यावेळी राकेश नेरे म्हणाले, आजचे तरुण भविष्यात इंजिनिअर, डॉक्टर, वकील होण्याची स्वप्ने बघतात. मात्र, कोणीच सैन्यात भरती होतो असे म्हणत नाही. आजचा तरूण वर्ग का या क्षेत्रापासून दूर जात आहे. अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच सैनिकांचे जीवन व सैन्याचे महत्त्व महत्व कसे अनन्यसाधारण आहे हे वेगवेगळ्या कथांमधून त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले.
इयत्ता सातवीतील विद्यार्थिनींनी झेंड्याला मानवंदना देण्यासाठी विजयी विश्व तिरंगा प्यारा हे गीत सादर केले. इ.८ वीतील विद्यार्थ्यांनी संचालन केले. शाळेचे शिक्षक संदीप देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ.८ वीची विद्यार्थिनी दुर्वा भामरे व सानिया शहा यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन कुणाल देवरे, मंगेश बेडसे, नितीन राजपूत यांनी केले.
पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांनी ‘वंदे मातरम’ तर आठवीच्या विद्यार्थ्यांनी ‘तेरी मिट्टी’ हे गीत सादर केले.