Chaupher News
साक्री : प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रचिती प्रि प्रायमरी स्कूलमध्ये प्रमुख पाहुणे जवान राकेश नेरे व शांताराम पगारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी संचलन केले व राष्ट्रगीत व ध्वजगीताने तिरंग्याला मानवंदना दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष्यस्थानी प्राचार्या भारती पंजाबी होत्या. यावेळी प्राचार्य अतुल देव, व्यवस्थापक वैभव सोनवणे, तुषार देवरे उपस्थित होते.
यावेळी राकेश नेरे यांनी विद्यार्थ्यांना देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची माहिती देऊन देशाच्या हितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. प्राचार्या भारती पंजाबी यांनी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा केला जातो याविषयी माहिती दिली.
कार्यक्रमात यूकेजीतील विद्यार्थिनी तिहारिका बोरसे, पुष्पांजली भामरे, प्रथम रोझ मधील हिमानी सूर्यवंशी, तिसरीची विद्यार्थिनी समीक्षा चव्हाण, चौथीची विद्यार्थिनी श्रद्धा भामरे यांनी प्रजासत्ताक दिनावर भाषण केले.
सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक मंगेश बेडसे यांनी केले. भूपेंद्र साळुंखे व वैष्णवी थोरात यांनी फलक लेखन तर वृषाली सोनवणे व प्रीती लाडे यांनी आकर्षक रांगोळी रेखाटली होती.