Chaupher News

पुणे पुन्हा ताब्यात घेण्याचा अजित पवार प्रयत्न करू लागले आहेत. पण ते इतकं सोपं नाही, भाजपच्या ताब्यात यायला वेळ लागतो. मात्र ताब्यात आल्यानंतर आपण सोडत नाही असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी केले.

पुणे शहर हे पूर्वी कलमाडींच होतं. नंतर ते अजित पवारांकडे आलं. पण आता पुणे हे भाजपाचे आहे. पुण्यात भाजपचे 98 नगरसेवक आहेत. अजित पवार पुणे ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. ते सोपं नसल्याचे सांगून राज्यातील सत्ताआपली फसवणूक करून गेलीय असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी केले.

सोलापूर शहराला सरकार केंद्रात आणि राज्यामध्ये असण्याची कधी आवश्यकता पडली नाही. सत्ता नसताना महापालिकेत भाजपचा महापौर बसला आहे. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या पत्नीला पराभूत करून भाजपचा खासदार निवडून आला. त्यामुळे या शहराचा रंग भगवा आहे असं विधान चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here