Chaupher News
पिंपळनेर : डोळ्याचे पारणे फिटेल अशी बालचमूंनी सादर केलेली नृत्य व विविध कलांच्या अविष्कारात पिंपळनेर येथील प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक प्रशांत पाटील, सेक्रेटरी कविता पाटील, मयूर पाटील, भारती पाटील उपस्थित होत्या.
तसेच दिपाली असंबे, उषा देशमुख, पूनम पवार, भाग्यश्री खैरनार, शोभा अहिरे, रीना कोतकर, शितल बिरारीस, अंजना चौरे, तृप्ती पाटील व अमृता खैरनार या महिला पालकांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
शिवाजी महाराज, नटराज व सरस्वती पूजनाने स्नेहसंमेलनाला सुरुवात झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे नृत्याद्वारे प्रदर्शन करून उपस्थित पालक व प्रेक्षकांची मने जिंकली. यावेळी आनंद उत्सवातील थाळी सजावट स्पर्धेतील विजेत्या वर्षा मराठे ( प्रथम ), निलीमा शेवाळे ( द्वितीय) व गायत्री ठाकरे ( तृतीय ) यांना संस्थापक प्रशांत पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे, समन्वयक राहुल पाटील, साक्री प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य अतुल देव, समन्वयक तुषार देवरे, प्रचिती प्रि प्रायमरी स्कूलच्या प्राचार्या भारती पंजाबी, समन्वयक वैभव सोनवणे उपस्थित होते. तर कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी शिक्षिका अनिता पाटील यांनी सांभाळली. कार्यक्रमाच्या शेवटी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका अर्चना देसले, अश्विनी पगार, पूजा नेरकर, पल्लवी मोरे, ज्योती खैरनार, अस्मिता बर्डे, कमल पवार, अश्विनी मोरे, शामल बच्छाव, शिक्षक रिपेश कासार व शिक्षकेत्तर कर्मचारी गणेश जिरे, रंजना शदाने, सुरेख खैरनार, विकास हेमाडे यांनी प्रयत्न केले.