पिंपरी : पिंपरीगाव ज्येष्ठ नागरीक संघाचा 22 वा वर्धापनदिन गुरुवारी विविध कार्यक्रमांनी साजरा झाला.
संघाच्या वर्धापनदिनानिमित्त भजन, ऑकेस्ट्रा, कॅरम स्पर्धा, चालण्याच्या स्पर्धा, स्मरणिका प्रकाशन, वयाची, 75, 80, 85 पूर्ण झालेल्या ज्येष्ठांचा सत्कार, विवाहास 50 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास उपमहापौर प्रभाकर वाघेरे, स्थायी समिती सभापती डब्बु आसवानी, नगरसेविका उषा वाघिरे, युवा उद्योजक संदीप वाघेरे, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे प्रभाकर कोळी, वसंत देशमुख, सुर्यकांत मुथियान, पिंपरी शाखा ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष एम एम मोरे, उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर गव्हाणे, कार्याध्यक्ष उत्तम कुदळे, खजिनदार मधुकर सोनार, किसन वाघेरे, अहिवळे सर, कुंभार सर, उदय वाघेरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी युवा उद्योजक संदीप वाघेरे म्हणाले की, ज्येष्ठ नागरीक मला गुरुसारखे आहेत. पिंपरी गावातील महालक्ष्मी मंदिर व मरिआईमाता मंदिराचा जिर्णोध्दार करण्यात आला असून 21, 22, 23 ऑक्टोबर रोजी करवीरपीठाचे शंकराचार्य नृसिंह भारती यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा व कळसारोहण सोहळा होणार आहे. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संदीप वाघेरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here