Chaupher News
मुंबई : ‘जोकर’, ‘पॅरासाईट’, ‘वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड’, ‘लिटील वूमन’, ‘१९१७’ अशा चित्रपटांना यंदाच्या ९२ व्या ऑस्कर Oscars 2020 पुरस्कारांचं नामांकन मिळालं होतं. कलाकारांची मेहनत, अभिनय कलेने गाठलेली एक वेगळी उंची आणि तंत्रज्ञानाचा वापर करत अधिक बहरलेली ही चित्रपट साकारण्याची कला नेमकी किती उंची गाठू शकते याची अनुभूती यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातून आली. अमेरिकेतील डॉल्बी थिएटर येथे पार पडलेल्या डोळे दीपवणाऱ्या या सोहळ्यात कलेचा आणि कलाकारांचा गौरव करण्यात आला.
रंगभूषा, ध्वनी संकलनापासून छायांकन आणि दिग्दर्शनासाठीचे ऑस्कर पुरस्कार अनेक सेलिब्रिटी आणि द अकॅडमीच्या सदस्यांसमक्ष प्रदान करण्यात आले. यामध्ये ‘१९१७’ आणि ‘पॅरासाईट’ या चित्रपटाने दमदार कामगिरी केल्याचं पाहायला मिळालं. दक्षिण कोरियाच्या ‘पॅरासाईट’ या चित्रपटाने यंदाचा ऑस्कर खऱ्या अर्थाने गाजवला. या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनाचीह सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरव करण्यात आला.