Chaupher News
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात आपला ६३ जागांवर स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. भाजप ७ जागांवर आघाडीवर आहे.
काँग्रेस सलग दुसऱ्यांदा निवडणुकीत आपले खाते उघडू शकले नाही. पटपडगंज मतदारसंघातून उप-मुख्यमंत्री मनीष सिसोदिया 13 व्या फेरीनंतर विजय मिळवला आहे. आपल्या विजयानंतर ते म्हणाले, भाजपने द्वेषाचे राजकारण केले. परंतु दिल्लीने काम करणाऱ्यांना निवडून दिले.
दिल्लीत सध्या आम आदमी पार्टीचे सरकार असून भाजपा 22 आणि काँग्रेस 7 वर्षांपासून सत्तेपासून दूर आहेत.
दरम्यान आताचे निकालाचे कल पाहता भाजप आणि काँग्रेसला सत्तेसाठी पुढील 5 वर्षे वाट पाहावी लागणार असे चित्र दिसत आहे.