Chaupher News

पिंपरी : चाकण जवळ म्हाळुंगे येथे अॅक्सिस बँकेचे एटीएम पळवण्याचा प्रयत्न झाला असून सदर प्रकार आज, बुधवारी (दि. 12) सकाळी उघडकीस आला.

चाकण जवळ म्हाळुंगे येथे अॅक्सिस बँकेचे एटीएम आहे. मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीन पळवण्याचा प्रयत्न केला. मशीन ओढून नेत असताना चोरट्यांना नागरिकांची चाहूल लागल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला. त्यामुळे चोरटे मशीन तिथेच सोडून पळून गेले, अशी माहिती म्हाळुंगे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांनी दिली.

एटीएममध्ये रोख रक्कम असून ती चोरीला गेलेली नाही. मात्र, एटीएम पळवून नेण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला. चाकण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, वाकड येथे आज सकाळी आरबीएल बँकेचे एटीएम फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. एकाच दिवशी दोन घटना उकडकीस आल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here