Chaupher News

पिंपरी : जगातील १९७ देशांची नावे अवघ्या ९४ सेकंदातबोलुन दाखवत वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडीया या किताबामध्ये नाव नोंदविलेल्या प्रीत राजेश
शिरोडकर या इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्याचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते महापौर दालनात गौरव करण्यात आला.
तसेच डॉ. राजेश शिरोडकर हे पिंपळे सौदागर येथील रहिवासी असुन ते चाईल्ड डेव्हलमेंट कोच व कॉरपोरेट ट्रेनर आहेत. त्यांनी ५४३ लोकसभा मतदार संघाची नावे अवघ्या ३.३० मिनीटात बोलण्याचा विक्रम केला असुन त्यांचाही सत्कार महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केला. प्रीत शिरोडकर हा इयत्ता दुसरी मध्ये चॅलेंजर पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागर येथे शिकत आहे. त्याने सलग दुस-यांदा हा विश्वविक्रम केला असून पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकीकात भर घातली आहे, त्याबद्दल आज त्याचा गौरव करण्यात आला. डॉ. शिरोडकर क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडीया, भोसरी, पुणे येथे गेले २१ वर्ष कॉरपोरेट ट्रेनर म्हणून काम करत आहेत, त्यांनाही गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here