Chaupher News

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने, छत्रपती शिवाजी महाराज समाज प्रबोधन पर्वानिमित्त शनिवार दि. १५ ते १९ फेब्रुवारी २०२० पर्यंत संभाजीनगर, चिंचवड येथे प्रबोधन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. त्याचे पहिले पुष्प प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांच्या आई-राजमाता जिजाऊ या विषयावरील व्याख्यानाने गुंफण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली.

या कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवार दि. १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, हे लाभणार असून प्रमुख उपस्थितीत आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, खासदार अमर साबळे असणार असून विशेष उपस्थितीमध्ये खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार संग्राम थोपटे,आण्णा बनसोडे, उपमहापौर तुषार हिंगे,स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी,सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार,विरोधी पक्षनेते नाना काटे, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात रविवार दि. १६ फेब्रुवारी २०२० रोजी प्रसिद्ध लेखक डॉ. संजय कळमकर हे आनंदाच्या वाटा या विषयावर व्याख्यान देणार आहेत. १७ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध ह्रदयरोग तज्ञ डॉ. योगेश गुर्जर यांचे गोष्ट एका ह्रदयाची या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. तसेच १८ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध व्याख्याते अरूण घोडके हे शिवरायांचे आठवावे रूप या विषयावर बोलणार आहेत. तर १९ फेब्रुवारी रोजी सायं. ७ वाजता शाहीर आलमगीर बागणीकर, सांगलीयांच्या शौर्यगाथा शिवरायांची या शाहिरीने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरीकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here