Chaupher News

जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर झालेल्या हल्ल्याला आज वर्ष पूर्ण झालं . पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी भ्याड हल्ला झाला होता. या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. ता वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत असून हल्ल्यातील शहिदांना पंतप्रधानांसह दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. ‘पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली. त्यांनी आपले जीवन आपल्या देशाच्या सेवेसाठी आणि संरक्षणासाठी वाहिले. पुलवामा हल्ल्यातील जवानांचे बलिदान देश कधीच विसरणारही नाही’ असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलेलं आहे. गृह मंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी ट्विट केल आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here