Chaupher News

पिंपरी : भारतीय संस्कृतीत व आजच्या धावपळीच्या जीवनात मनाच्या शांतीला खूप महत्त्व असून यांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी चिखली येथील इनोव्हेटीव्ह स्कूलमध्ये शांती प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते.
शांती बाहेर शोधून सापडत नाही ती अंतर्मनात असते त्यासाठी भौतीक व आध्यात्मिक मार्गच अवलंबवावा लागतो. याचे ज्ञान विद्यार्थ्यांनाही व्हावे हा या मागचा उद्देश होता.कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी हम को मन की शांती देना हे गीत सादर केले. तर इस जहाँ के लिए या गाण्यावर नृत्य सादर करण्यात आले. तसेच गौतम बुद्धांनी सांगितलेल्या शांतीसंदेशावर नाटक सादर केले. संचालक मुख्याध्यापिका कमला बिष्ट यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली. विद्यार्थ्यांनीही आपण शांतीदूत म्हणून काम करणार असल्याची शपथ घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवश्री भोंडवे यांनी केले. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here