Chaupher News

पुणे : पुणे मेट्रोच्या वनाज ते कर्वे रोड आणि संत तुकाराम नगर ते बोपोडी या दोन्ही मार्गाचे 12 किलोमीटर अंतराचे काम मार्चअखेर पूर्ण होणार होईल. मेट्रो चाकणपर्यंत आणि दुसऱ्या मार्गावर वाघोली पर्यंत वाढवण्याची मागणी होत आहे त्यासाठी डीपीआर तयार करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे, तसेच हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गासाठी आवश्यक जमीन हस्तांतरणाची कार्यवाही मार्चअखेर पूर्ण होईल असे पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाचे रखडलेले काम आता आपण या खात्याचे मंत्री झाल्याने वेगाने सुरू करणारे करणार आहोत. राज्य सरकार बरोबर एक स्वतंत्र बैठक आणि केंद्रांमध्ये ही स्वतंत्र बैठक घेऊन मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाला भेटी देणार आहे. तीन वर्ष आपल्या खात्याचे मंत्री नव्हते त्यामुळेहे  काम रेंगाळले, असेल्याचे जावडेकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here