Chaupher News

पुण्यातील हडपसरच्या अण्णा साहेब मगर कॉलेजच्या परिसरात व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त बघून लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पोस्टरर्स लावण्यात आले आहे. या पोस्टरवर लग्नाच्या शुभेच्छा देत ‘आय लव्ह यू’ असं लिहून पठ्ठ्याने जगजाहीरपणे प्रेमाची कबुली दिली आहे. पण, या लग्नाच्या शुभेच्छा ह्या 15 फेब्रुवारी म्हणजे उद्यासाठी दिल्या आहे. विशेष म्हणजे, या पोस्टर्सवर ‘सॉरी अप्पू’ असं ठळक अक्षरात लिहिण्यात आलं आहे.
‘सविताभाभी…इथंच थांब!!’ या होर्डिंगची चर्चा थांबत नाही तेच ‘सॉरी अप्पू’ नावाच्या पोस्टर्सनी एकच धुमाकूळ घातला आहे.

आता हे पोस्टर्स पाहून पुणेकर आणखी बुचक्कळ्यात पडले आहे. आता हा अप्पू कोण? असा प्रश्न पडला आहे. येणारे जाणारे हे पोस्टर्स पाहून काही तरी अर्थ काढण्याचा प्रयत्न करत आहे. तर काही जणांना हा कॉलेजमधील तरुणांकडून घडवण्यात आलेला प्रकार असावा असा अंदाज बांधला जात आहे. विशेष म्हणजे, याआधीही पिंपरी चिंचवडमध्ये ‘शिवडे आय एम सॉरी!’ अशा पोस्टर्सचा असाच प्रकार घडला होता. पण, हा प्रताप कुठल्याही कॉलेजच्या तरुणाकडून घडला नसून तो एका डॉक्टराकडून घडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here