Chaupher News
दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प तीन दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत. ट्रम्प दाम्पत्यांच्या भारत दौऱ्याची सुरूवात २४ फेब्रुवारी २०२० पासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमधून होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प तीन तासांसाठी गुजरातमध्ये येणार आहेत. जगातील सर्वात शक्तीशाली नेत्याच्या स्वगातासाठी गुजरातमध्ये स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. गुजरात सरकारकडून अहमदाबादमध्ये ठिकठिकाणी तयारी सुरू केली जात आहे.
ट्रम्प यांच्या स्वागतासाठी पैशांची कोणतीही कमतरता भासू नये, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानतर अहमदाबाद नगर निगम आणि अहमदाबाद शहरी विकास प्राधिकरण रस्ते दुरुस्तीच्या कामात जुंपेल आहेत. यासाठी जवळपास १०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.