Chaupher News
साक्री : नोबेल सायन्स फौंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सायन्स टॅलेन्ट सर्च परिक्षेच्या पहिल्या फेरित प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचा सहावीतील विद्यार्थी पूर्वेश राकेश काकुस्ते याने घवघववीत यश संपादन केले असून दुसर्या फेरीसाठी त्यांची निवड झाली आहे. त्याने मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन प्रशांत पाटील, विद्यालयाचे प्राचार्य अतुल देव, प्राचार्या भारती पंजाबी, व्यवस्थापक तुषार देवरे व वैभवे सोनवणे यांच्यासह शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
पूर्वेशची परिक्षेच्या दुसर्या फेरीत निवड झाल्यामुळे त्याला भारतातील चार इस्त्रो सेंटर पैकी एका सेंटरला भेट देण्याची तसेच तेथील वैज्ञानिकांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.