वाघाडी : सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन योग अँड नॅचरोपॅथी या भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे योग विद्याधाम संस्थेच्या विद्यमाने तालुक्यातील वरुळ येथे योग व मधुमेह जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. योगाभ्यासाची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली व तसा सरावही करून घेण्यात आला. यानंतर व्याख्यानाचे आयोजन करुन आहार, दिनचर्या, मधुमेह व त्याची कारणे, दुष्परिणाम यावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मोफत रक्तशर्करा तपासणीही करण्यात आली.
कार्यक्रमात विकास पाटील, प्रमोद पटेल यांच्यासह ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. योगशिक्षक म्हणून भारत साळुंखे, संजय शिंपी, योगेश कोठावदे यांनी काम पाहिले. याप्रसंगी डॉ.मनोज निकम यांनी मधुमेहावर माहिती दिली.