साक्री : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पदाधिकारी यांच्याविषयी बेजबाबदार वक्तव्य केल्याने दूग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास जोडे मारून दहन करण्यात आले. साक्री तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हे निषेध आंदोलन करण्यात आले.
ना.महादेव जानकर यांनी भगवानगड येथे झालेल्या दसरा मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यावर अशोभनीय टीका केली. त्याच्या निषेधार्थ काल (दि.13) दुपारी साक्री तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथील विश्रामगृहाजवळ ना.महादेव जानकर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारुन दहन करण्यात आले. त्यांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या व त्यांच्या राजीनाम्याची आणि कठोर कार्यवाहीची मागणी केली.
याप्रसंगी धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या ज्योती पावरा, जि.प. सभापती लीलाताई बेडसे, महिला आघाडीच्या तालुका उपाध्यक्षा उज्ज्वला बेडसे, साक्री नगरपंचायतीच्या सभापती स्वाती बेडसे, जिल्हाउपाध्यक्ष जितेंद्र मराठे, सभापती अँड शरद भामरे, राष्ट्रवादी पं.स.चे माजी उपसभापती नितीन बेडसे ,किसान सेलचे अरुण अहिरराव ,राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष युवराज मराठे, भूषण नांद्रे, सतीश पगार, संदीप मासुळे, शंकर गीते, गोकूळ चित्ते आदींसह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते