Chaupher News
पिंपळनेर : बालचमूंनी सादर केलेले शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे विविध देखावे, वेशभूषा व भगव्या वातावरणात पिंपळनेर येथील प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिता पाटील होत्या. कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांची प्रतिमा व सरस्वती पूजनाने झाली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्याच नव्हे, तर सबंध हिंदुस्थानच्या इतिहासातील ही एक रोमहर्षक आणि तितकीच महत्त्वाची घटना आहे. अशी घटना की जिने हिंदुस्थानच्या इतिहासालाच वळण लावले. मोगल पातशहाच्या राजधानीतून, त्याच्या कैदेतून आजवर कोणी सहीसलामत निसटू शकले नव्हते. प्रत्यक्ष औरंगजेबाच्या बापाचे शाहजहानलाही ते जमले नव्हते. पण शिवाजी महाराजांनी ते करून दाखविले. आणि असे केले, की पुढे आयुष्यभर औरंगजेब बादशहा त्या एका घटनेबद्दल स्वतःला कोसत राहिला. पश्चात्ताप करीत राहिला, अशी माहिती पूजा नेरकर व अनिता पाटील यांनी दिली.
तेजस बिरारीस, अनुष्का पाटील, सर्वेश खैरनार यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासावर भाषणे केली. त्यानंतर शिक्षिका अश्विनी पगार यांच्या मार्गदर्शनाखाली दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास नृत्यातून मांडला. विद्यार्थ्यांनीही विविध वेशभूषा केल्या होत्या. यामध्ये तेजस बिरारीस व सर्वेश खैरनार याने शिवाजी महाराजांची भूमिका, अफजल खानाची भूमिका उद्य सोनवणे तर राजमाता जीजबाईंंची वेशभूषा लावण्या मुसळे व अनुष्का पाटील हीने सईबाईंची वेशभूषा केली होती.
शिवजयंतीचे औचित्य साधून शिक्षिका ज्योती खैरणार यांनी आकर्षक रांगोळी काढली तर फलक लेखन अश्विनी मोरे व कमल पवार यांनी केले. सूत्रसंचालन अस्मिता बेर्डे यांनी केले. तर आभार अर्जना देसले यांनी मानले. तसेच कार्यक्रमासाठी शिक्षिका अर्चना देसले, पूजा नेरकर, पल्लवी मोरे, अस्मिता बर्डे, रुपेश कासार, शामल बच्छाव, शाळेचे व्यवस्थापक राहुल पाटील यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी संगिता कोढावदे, सुरेखा खैरनार, गणेश जीरे, विकास हेमाडे व रंजना भदाणे यांनी सहकार्य केले.