Chaupher News

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांची यांत्रिकी पध्दतीने साफसफाई करणार आहे. त्याकरिता 647 कोटी रुपयांच्या निविदा काढली असून यामुळे सुमारे बाराशे आसपास कामगार बेरोजगार होणार आहेत. मुख्य आरोग्य कार्यकारी अधिका-यांनी ही निविदा काढून कामगारांची कुटूंबे उध्दवस्त करु लागले आहेत. त्यामुळे महापालिकेसमोर गुरुवारी इन-आऊट गेटवर आंदोलन करुन दोन तासांहून अधिकाळ महापाैर-अन्य पदाधिकारी, अधिकारी-नागरिकांना रोखून धरले.

पिंपरी चिंचवड स्वयंरोजगार सेवा संस्थेचे फेडरेशनकडून हे आंदोलन केले होते. या आंदोलनात राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने, शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे, अमित गावडे, सुलभा उबाळे, मारुती भापकर, वैशाली घोडेकर, सविता खराडे, प्रल्हाद कांबळे, जे.डी.पवार आदी सहभागी झाले होते.

शहरातील रस्त्यांची यांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्याची काढलेल्या 647 कोटी रुपयांच्या निविदेत रिंग झाली आहे. या निविदेमुळे कामगार बेरोजगार होणार असून ही निविदा रद्द करण्यात यावी, याकरिता विरोधकांसह सफाई कामगारांचे पालिकेसमोर आंदोलन केले. महापालिकेचे इन-आउटचे दोनही गेट बंद केले होते. त्यामुळे आयुक्तांसह अधिकारी महापालिकेत अडकले होते. आंदोलनादरम्यान स्वतः महापौरदेखील अडकल्या होत्या. पावणे सातच्या सुमारास आयुक्तांनी निवेदन स्वीकारले. त्यानंतर आंदोलनका-यांनी रस्ता मोकळा करून दिला आहे.

महापालिकेच्या 8 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणा-या अंतर्गत रस्त्यांची तसेच मुंबई – पुणे महामार्गाच्या दुतर्फा रस्त्यांची यांत्रिकी पध्दतीने दैनंदिन साफसफाई करण्यात येणार आहे. 1 हजार 670 किलोमीटर लांबीच्या रस्ते साफसफाई कामासाठी सहा विविध ‘पॅकेजेस’ मध्ये विभागणी करत 7 वर्ष कालावधीसाठी 647 कोटी रुपयांची निविदा काढली आहे. ठराविक ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेऊन नियम, अटी-शर्ती बनविले आहेत. या निविदेमुळे 1200 कामगार बेरोजगार होणार असल्याने निविदा रद्द करण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here