Chaupher News

रविवारपासून ईशान्य दिल्लीत सुरु असलेला हिंसाचार आता थांबला असून या भागातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र, या हिंसाचारामधील मृतांचा आकडा आता ३४वर पोहोचला आहे. यांपैकी दोघांचे मृतदेह एका नाल्यामध्ये सापडले आहेत. दरम्यान, प्रक्षोभक भाषणं करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करावेत किंवा नाहीत यावर आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी होणार आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींनी राष्ट्रपती रामनात कोविंद यांची भेट घेतली.
दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी दिल्ली हायकोर्टात सुरु असलेल्या हिंसाचाराच्या खटल्यात सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एम. के. आचार्य, अमित महाजन आणि रजत नायर यांना दिल्ली पोलिसांचे वकील म्हणून नियुक्त केले आहे.
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हिंसाचारासंबंधी एक उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, कैलाश गहलोत आणि इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये हिंसाचारग्रस्त भागातील लोकांना दिलासा देण्याबाबत चर्चा होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here