Chaupher News

पिंपरी चिंचवड शहरातील जून्या इमारतींना कर योग्य मूल्य लागू करण्याच्या प्रस्तावावर शिवसेना गटनेत्यांना महापाैरांनी बोलण्यास मज्जाव केला. त्यावरुन संतापलेल्या शिवसेना गटनेत्यांनी हातातील ग्लास जमिनीवर आपटून महापाैरांचा निषेध व्यक्त केला. तर भाजपच्या महिला नगरसेविकांनी महिला महापाैरांना ग्लास फेकून मारल्याचा आरोप करीत शिवसेना गटनेत्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. तसेच शिवसेना गटनेत्यांने महापाैरांची जाहीर माफी मागावी, अन्यथा सभागृह बंदी घालण्याची कारवाई करु, असा इशारा पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेत फेब्रुवारी महिन्याची तहकूब महासभा आज (बुधवारी) पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी महापाैर उषा ढोरे होत्या. या महासभेत भाजप आणि शिवसेनेत चांगलाच राडा पहावयास मिळाला. याप्रसंगी भाजपकडून महिला महापाैरांना ग्लास फेकून मारल्याचा आरोप करत निषेधाच्या घोषणा देवून गोंधळ घालण्यात आला.

सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले की, शिवसेना गटनेत्यांनी सभागृहात गैरवर्तणूक करत महिला महापाैरांचा अपमान केला आहे. या वृत्तीचा आम्ही निषेध व्यक्त करतो. सभागृहात महापाैरांना पुर्ण स्वातंत्र्य असून कोणाचाही दबाव नाही. तसेच त्यांनी महापाैरांची माफी मागावी, अन्यथा त्यांना सभागृहात येण्यास आम्ही बंदी घालू, असा इशारा दिला आहे.

महापाैर उषा ढोरे म्हणाल्या की, माझ्यासह सगळ्यांना कोणी तरी गाॅड फादर आहे. शिवसेनेच्या गटनेत्यांना सतत बोलण्याची संधी मी देते. त्यावेळी त्यांनी हात वरती केलाच नाही. परंतू, त्यांनी चिडून ग्लास फोडला. एका महिलेवर ग्लास फिरकावून दिला. त्यांनी सभागृहाची शिस्त आणि भाषा कशी वापरायची हे शिकून घ्यावे, त्यांनी माझी माफी मागायला हवी, असेही त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here