Chaupher News

पिंपरी-चिंचवड महापालिकेत नाशिकचे प्रशांत जोशी यांची आणि औरंगाबादचे बाळासाहेब खांडेकर यांची पदोन्नतीने सहाय्यक आयुक्तपदी प्रतिनियुक्ती झाली आहे. त्यांची बदली 14 सप्टेंबर 2019 रोजी झाली होती. बुधवारी (दि. 26) ते महापालिकेत रुजू झाले आहेत.

राज्य सरकारने महसूल विभागातील तहसीलदार संवर्गातील अधिका-यांना आणि वन विभागातील अधिका-यांना सप्टेंबर 2019 मध्ये पदोन्नती दिली आहे. या अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. राज्य सरकारचे उपसचिव डॉ. माधव वीर यांना याबाबतचा आदेश पारित केला आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रतिनियुक्तीवर नाशिकचे प्रशांत जोशी यांची आणि औरंगाबादचे बाळासाहेब खांडेकर यांची पदोन्नतीने सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.

दरम्यान, पिंपरी पालिकेत 11 सहाय्यक आयुक्तांची पदे मंजूर आहेत. त्यात 6 शासनाने दिलेले प्रतिनियुक्‍तीवरील आणि 5 महापालिकेचे अधिकारी असा कोटा आरक्षित आहे. पिंपरी महापालिकेत राज्य सरकारच्या सेवेतील ‘सीईओ’ केडरचे भांडार विभागाचे मंगेश चितळे, नागरवस्ती विभागाच्या स्मिता झगडे, आकाश चिन्ह परवाना विभागाचे सुनील अलमेलकर कार्यरत आहेत. आता नवीन दोन अधिका-यांची नियुक्ती झाल्याने प्रतिनियुक्तीवरील एक पद रिक्त आहे.

तर, महापालिकेतील प्रशासन विभागाचे मनोज लोणकर, झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे चंद्रकांत इंदलकर, ‘अ’ प्रभागाच्या आशादेवी दुरगुडे, ‘ह’ प्रभागाचे क्षेत्रिय अधिकारी संदीप खोत, ‘क’ प्रभागाचे अण्णा बोदडे असे पाच सहायक आयुक्त कार्यरत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here