Chaupher News

दिल्ली : दिल्ली हिंसाचारादरम्यान इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी अंकित शर्मा यांची अतिशय निदर्यतेने हत्या करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालाट समोर आले आहे. अंकित यांच्या पोटावर आणि पाठीवर २०० जखमा आढळून आल्या आहेत.
अंकित शर्मा यांचा मृतदेह २६ फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या चांदबाग परिसरातील एका नाल्यात सापडला होता. हिंसक जमावाने या अधिकाऱ्याचा आधी छळ केला नंतर त्याची हत्या केल्याचा अंदाज आहे. आयबी अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी आम आदमी पार्टीचा नगरसेवक ताहीर हुसैनविरोधात गुरुवारी एफआयआर नोंदवण्यात आला. वडिलांच्या तक्रारीवरुन दयालपूर पोलीस ठाण्यात हा एफआयआर नोंदवण्यात आला.पोलीस चौकशी पूर्ण होईपर्यंत आपने ताहीर हुसैनला पक्षातून निलंबित केले आहे.
उत्तर पूर्व दिल्लीत झालेल्या हिंसाचारातील मृतांचा आकडा ३८ पर्यंत पोहोचला आहे. मंगळवारी रात्रीपासून कुठेही हिंसाचाराची घटना घडलेली नाही. दिल्ली पोलिसांनी ४८ एफआयआर नोंदवले असून १३० जणांना अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here