Chaupher News
मुस्लिम समाजासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये पाच टक्के आरक्षण दिलं जावं म्हणून अध्यादेश काढून कायदा करणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. विधान परिषदेच्या प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी ही माहिती दिली. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार मुस्लीम समाजासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये पाच टक्के आरक्षणाचा अध्यादेश काढून सरकार कायदा तयार करणार आहे. शिवाय आरक्षण लागू करण्याबाबत सरकार विचाराधीन आहे असंही राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.