Chaupher News

पिंपरी : महापालिका स्थायी समिती अध्यक्षांची निवड शुक्रवारी (दि. 6) करण्यात येणार आहे. महापालिकेतील मधुकर पवळे सभागृहात दुपारी 12 वाजता विशेष सभेत ही निवड केली जाणार आहे.त्यासाठी सोमवारी (दि.2) उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्याच दिवशी भाजपकडून स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी कोणाला संधी दिली जाते, हे स्पष्ट होणार आहे.
समितीचे 8 सदस्य आज (दि. 29) निवृत्त होत आहेत. त्यामुळे तत्पूर्वी बुधवारी (दि. 26) नवीन 8 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी यांची मुदतही शनिवारी संपत आहे.
अध्यक्ष पदासाठी घेतल्या जाणाऱ्या विशेष सभेच्या पीठासीन अधिकारी पदी पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांची निवड करण्यात आली आहे. सोमवारी स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी दुपारी 3 ते 5 या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहे.

त्याच दिवशी भाजपकडून स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी एक नाव निश्‍चित करून अर्ज भरला जाणार आहे. स्थायी समितीच्या चाव्या यंदा कोणत्या सदस्याच्या हाती दिली जाते, याविषयी सध्या उत्सुकता कायम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here