Chaupher News

पिंपरी : महिलांच्या सक्षमीकरणासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पवनाथडी जत्रेच्या माध्यमातून बचत गटांना भव्य अशी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्याद्वारे महिलांना स्वताच्या हाताने बनविलेल्या वस्तू विकून मिळालेल्या उत्पन्नातून ताठ मानेने जगण्याची प्रेरणा मिळणार आहे. तसेच, ग्राहकांनी सुध्दा पवनाथडीतील सांस्कृतीक कार्यक्रमांचा आनंद घेण्याबरोबरच स्वादिष्ट, चविष्ठ पदार्थ्यांचा आस्वाद घेण्यासाठी अवरजून यावे, असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पवनाथडीची माहिती देण्यासाठी आज रविवारी (दि. 1) पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यामध्ये महापौर ढोरे बोलत होत्या. यावेळी पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला कुटे, नगरसेवक एड. मोरेश्वर शेडगे, नागरवस्ती विकास योजना विभागाचे समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले आदी यावेळी उपस्थित होते.

पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले की, 4 ते 8 मार्च दरम्यान सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर पवनाथडी सुरू राहणार आहे. त्यामध्ये विविध सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. 4 मार्च रोजी पद्मश्री राहिबाई पोपेरे यांच्या हस्ते पवनाथढीचे उद्घाटन होणार आहे. सायंकाळी सव्वासात वाजता जल्लोष महाराष्ट्राचा, 5 मार्च रोजी ऐतिहासिक स्त्रीपर्व कार्यक्रम, लक्ष्मण रेषा गीतांचा कार्यक्रम होणार आहे. 6 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता ”यदा कदाचित” हा तुफान विनोदी नाटक सादर होणार आहे. 7 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता ”मधुरा रेसिपी” संवाद कार्यक्रम आणि सात वाजता ”लोकगीतांची बरसात” हे कार्यक्रम होणार आहेत. 8 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता ”खेळ पैठणीचा” आणि सात वाजता ”लावण्यसुंदरी” हा लावण्या सादरीकरणाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर पवनाथडीची सांगता होणार आहे.

विलास मडिगेरी म्हणाले की, यंदाच्या पवनाथडी जत्रेत ”पॉईंट ऑफ व्ह्युव ” संस्थेच्या मार्गदर्शनानुसार काही बदल करण्यात आले आहेत. प्रवेशद्वारावरील कमान, मॅटींग, मंडप व्यवस्था यात नाविण्यता आणली जाणार आहे. त्यासाठी संस्थेने शहरातील नामांकीत कंपन्या, व्यावसायिकांकडून अर्थसहाय घेतले आहे. या कामापोटी संस्थेला कोणत्याही प्रकारचे अर्थसहाय दिले जाणार नाही.

पवनाथडीत यावर्षी काही बदल केले आहेत. दरवर्षी, अर्जांची छानणी करून कागदोपत्री पुर्तता करणा-या अर्जदारांची सोडत काढून महिला बचत गटांना गाळे दिले जायचे. मात्र, यावर्षी आलेल्या सर्वच अर्जादारांना गाळे देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी 1 हजार 225 गाळे वाटप केले जाणार आहेत. मागच्या वर्षीपेक्षा अधिक उलाढालीचे टार्गेट समोर ठेवले आहे.

संभाजी ऐवले, समाजविकास अधिकारी, नागरवस्ती विकास योजना विभाग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here