Chaupher News
पॅन कार्ड आणि आधार कार्ड ३१ मार्च २०२० पर्यंत लिंक केलं नाही तर थोडा थोडका नाही १० हजारांचा दंड भरावा लागणार आहे. एवढंच नाही तर तुमचं पॅन कार्ड चुकीचं असेल म्हणजेच त्यावर चुकीची माहिती असेल आणि ते आधारशी लिंक झालं नाही तरीही एवढाच दंड भरावा लागणार आहे. इन्कम टॅक्स कायदा सेक्शन २७२ बी अन्वये हा दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुमचे आधार आणि पॅन लिंक करा नाहीतर १० हजारांचा दंड भरण्याची तयारी ठेवा.
३१ मार्च २०२० पर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक झाले नाही तर इतर अनंत अडचणींचा सामना असं करणाऱ्यांना करावा लागणार आहे. जे आधार आणि पॅन ३१ तारखेपर्यंत लिंक करणार नाहीत त्यांचे आधार १ एप्रिल २०२० पासून बाद ठरण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
आधार कार्डाची गरज एक ओळखपत्र म्हणून तर आहेच याशिवाय ड्रायव्हिंग लायसन्स, बँक अकाऊंट, ५० हजारांच्या वरचे व्यवहार यासाठीही ते महत्त्वाचे आहे. मात्र ३१ मार्च पर्यंत आधार आणि पॅन कार्ड लिंक केले नाही तर ते या सगळ्या प्रक्रियांसाठी वापरता येणार नाही अशीही शक्यता आहे. जोपर्यंत दंड भरुन आधार आणि पॅन कार्ड लिंक केले जात नाही तोपर्यंत त्या संबंधित व्यक्तीला या सगळ्या प्रक्रिया करता येणार नाहीत अशीही माहिती समोर येते आहे.