Chaupher News
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावीच्या परीक्षेस आज पासून सुरूवात झाली. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दहावीचा मराठी विषयाचा पेपर फुटल्याची घटना घडली आहे. जळगावमधील मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा परीक्षा केंद्रावर हा धक्कादाय प्रकार घडल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हा पेपेर कॉपीहबहाद्दरांच्या व्हॉट्सअपवर देखील पोहचल्या असल्याचेही समोर आले आहे.
या धक्कादायक प्रकारामुळे शिक्षण विभागाच्या कामाकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तर, शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांच्या परीक्षेसंबंधीच्या आदेशांकडे दुर्लक्ष केले गेल्याचेही दिसून आले आहे.
सर्व परीक्षा केंद्रांवरील तयारी कालपर्यंत पूर्ण झाली होती, शिवाय परीक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला असल्याचे सांगण्यात आले होते. परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी एकूण २७३ भरारी पथकांसह बैठे पथकाची आणि विशेष महिला भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच २५ प्रश्नपत्रिकांचे स्वतंत्र लाखबंद पाकीट पर्यवेक्षक परीक्षा कक्षातील दोन विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेऊन उघडतील, असेही सांगितले गेले होते.