Chaupher News

पिंपरी :राष्ट्रवादीच्या पंकज भालेकर यांनी माघार घेतल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपच्या संतोष लोंढे यांची आज (शुक्रवारी) बिनविरोध निवड झाली. लोंढे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी रुबल अग्रवाल यांनी जाहीर केले.
स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सोमवारी (दि.2) अर्ज दाखल करण्यात आले होते. सत्ताधारी भाजपकडून संतोष लोंढे आणि राष्ट्रवादीचे पंकज भालेकर यांनी अर्ज दाखल केले होते. स्थायीत 11 सदस्यांसह भाजपचे बहुमत आहे. त्यामुळे भाजपचे लोंढे यांची निवड निश्चित मानली जात होती. त्यावर आज शिक्कामोर्तब झाले. महापालिकेतील स्थायी समिती सभागृहात आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. राष्ट्रवादीच्या पंकज भालेकर यांनी माघार घेतली. त्यामुळे लोंढे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी रुबल अग्रवाल यांनी जाहीर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here