Chaupher News

पिंपरी : रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) खासगी येस बॅंकेवर निर्बंध लागू केल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तब्बल 983 कोटी रुपये व्याजासह ठेवी अडकल्या आहेत. लेखा विभागाने 2 फेब्रुवारीला बॅंकेला पत्र देवून 425 कोटी रुपयांची मागणी करुनही ती रक्कम पालिकेला अद्याप मिळालेली नाही.

महापालिकेला जनता बॅंकेसह अन्य काही बॅंकाचे प्रस्ताव आले होते. परंतू, महापालिका येस बॅंकेने 8.15 टक्के सर्वांधिक व्याजदर देण्यास बॅंकींग क्षेत्रातील सोयी-सुविधा उपब्धल करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे महापालिकेच्या लेखा विभागाने राष्ट्रीयकृत बॅंकामधील ठेवी काढून आॅगस्ट 2018 मध्ये हजारो कोटी रुपयाच्या ठेवी येस बॅंकेकडे वर्ग केल्या. मात्र निर्बंधांमुळे येस बँकेच्या खातेदारांना महिन्याला 50 हजार रुपयेच काढता येणार असून महापालिकेला पैसे काढण्यास अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here