Chaupher News

पिंपरी : चिंचवड येथील दळवीनगर परिसरात शनिवारी (दि.7) पहाटे नव्याने टाकलेली पाण्याची पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाहून गेल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल झाले आहेत.

पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन टाकण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. यासाठी खोदकाम करण्यात आले. मुख्य जलवाहिनीतुन पहाटे पाणी सोडण्यात आले. मात्र, निकृष्ट केलेल्या कामामुळे नव्याने टाकलेली पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. या प्रकारामुळे दळवीनगर भागात रस्त्यावरच पाणी साचले होते. तब्बल दोन तास या जलवाहिणीतून पाण्याची नासाडी सुरू होती.

दळवीनगरपासून ते प्रेमलोक पार्क पर्यंतच्या रस्त्यावर पाणी वाहत होते.या भागात नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी वारंवार रस्ते खोदले जात आहेत.मात्र कामाची अर्धवट माहिती असणारे अकुशल कामगार हे काम करत असल्याने पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरू असून याकडे पालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

रात्री उशिरापर्यंत मुख्य पाईपलाईन जोडण्याचे काम सुरू होते.पहाटे या पाईपलाईनची जोडणी तुटल्याने पाण्याची नासाडी झाली.संपुर्ण परिसर जलमय झाला होता.या मुळे नागरिकांचे व वाहन चालकांचे हाल झाले.या प्रकारात दोषी असणाऱ्या ठेकेदारावर व अधिकाऱ्यांवर आयुक्तांनी कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here