Chaupher News
सौदी अरेबिया आणि रशिया यांच्यात सुरु असलेल्या वादामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे याचा फायदा भारताला होऊ शकतो. पेट्रोलचे दर प्रति लीटर ५० रुपयांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. सध्या एक लीटर पेट्रोलसाठी आपल्याला ७५ ते ७८ रुपये मोजावे लागतात. मात्र हे दर सुमारे २५ ते २८ रुपयांनी कमी होऊ शकतात अशी शक्यता आहे.