Chaupher News
उदयनराजे भोसले यांना पुन्हा एकदा संसदेची दारे खुणावू लागली आहेत. या महिन्याच्या अखेरीस राज्यसभा सदस्यत्वासाठी निवडणूक होणार असून त्यासाठी भाजपाने उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीत उदयनराजे भोसले यांचंही नाव आहे. या शिवाय भाजपानं महाराष्ट्रातून आरपीआय(ए)चे नेते रामदास आठवले यांनाही उमेदवारी दिली आहे.
२६ मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपानं बुधवारी उमेदवार यादी जाहीर केली आहे. त्यात मित्र पक्षांच्या दोन उमेदवारांसह एकूण ११ जणांची नावं आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांचंही नाव त्यात आहे.