Chaupher News

मुंबई : भारतात कोरोना रुग्णांची संख्या 60 वर पोहोचली आहे. गेल्या तीन दिवसांत या घटनांमध्ये वाढ झाली असून सर्वात जास्त परिणाम केरळमध्ये दिसून येत आहे. तर महाराष्ट्रात सुद्धा कोरोनाचा शिरकाव झाला असून ,आतापर्यंत 11 रुग्ण आढळून आली आहे. त्यामुळे परिस्थती लक्षात घेऊन सरकारने मास्क आणि हँण्ड वॉश हे रेशन दुकानातून अल्प दरात उपलब्ध करुन देण्याची मागणी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
विधानसभेत बोलताना पाटील म्हणाले, कोरोना व्हायरस महाराष्ट्रात सुद्धा आला असून पुण्यात रुग्ण आढळून आले आहेत. तर लोकांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे मास्क आणि हँण्ड वॉश हे सर्वसामान्य व्यक्तींना घेणे परवडणारे नाही. त्यामुळे किमान रेशन घेणाऱ्या कुटुंबांना मास्क आणि हँण्ड वॉश हे रेशन दुकानातून अल्प दरात उपलब्ध करुन देण्याची मागणी पाटील यांनी केली.
पुण्यात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची दिसून येत असून मंगळवारी पाच असणारी बाधितांची संख्या आता आठवर पोचल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता पुण्यात आठ आणि मुंबईत दोन आणि आता नागपूरात एक अशा एकूण 11 व्यक्तींना महाराष्ट्रात कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here