चौफेर न्यूज : आजच्या स्थितीला संपूर्ण भारतात महाराष्ट्रासह कोरोना या जीव घेण्या विषाणूने भयानक थैमान घातले आहे .यावर उपाय म्हणून सरकारने दिनांक १४ एप्रिल पर्यंत घरातून बाहेर न पडण्याचे सर्व जनतेला आदेश दिलेले आहेत. यामुळे हातावर पोट भरणाऱ्यांचा जीवनमान अत्यंत धोक्यात आलं आहे. आणि यांच्या पुढे त्यांच्या मुला बाळांच आणि स्वतःच पोट भरण्याचा खुप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण संपूर्ण भारत बंदीमुळे त्यांच्या हाती कोणतंही काम लागत नाही आहे.म्हणून त्यांच्या समोर उपासमारीची वेळ आली आहे. म्हणून या गोष्टींना लक्ष्यात घेऊन सामाजिक दातृत्व दाखवून अल्प योगदान म्हणून साक्री येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूल आणि जुनिअर कॉलेज चे संस्थापक अध्यक्ष प्रशांत भीमराव पाटील यांनी स्वतःच्या स्व खर्चातून पंधराशे किलो तांदूळ खेडे पाड्यांवरच्या गोर गरीब जनतेला वाटून त्यांना पोट भरण्याचा खुप मोठा आधार दिला आहे.
देशातील आजची हातावर पोट भरणाऱ्या जनतेची वाईट परिस्थिती पाहून अक्षरश्या रडू कोसळले असता समस्त मानवजात घोर संकटात आहे. गोर गरीब व हातमजूर,दररोज हातावर आणून पोटभरणाऱ्या गरीब जनतेपुढे या कोरोना महामारीमुळे,गरीब जनतेच्या मुला बाळांच व स्वतःच पोटभरण्याचा मोठा प्रसंग उभा राहिलेला आहे.अशा परिस्थितीत आपण आपल्या कुटुंबासोबतच थोडे अन्न गरजू लोकांना अन्नाचा घास घालूया याचाच विचार करत प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत भीमराव पाटील यांच्या कढून गरजूंना एक मदतीचा हात म्हणून साक्री, शेणपूर,दिघावे,कावठे येथे तांदूळ वाटप करण्यात आले. तांदूळ वाटप करतांना शाळेचे व्यवस्थापक वैभव भरत सोनवणे, शिक्षक नितीन राजपूत,जितेंद्र काकूस्ते तसेच कर्मचारी प्रमोद खैरनार सुभाष पाटील,प्रकाश नंदन,महेंद्र पानपाटील,गणेश पगारे,शरद पाटील आदी उपस्थित होते.त्यांच्या या उत्तम कामगिरीमुळे गरिब जनतेने त्यांचे कौतुक करून आभार व्यक्त केल आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here